देणगी नाही संधी द्या...
आपल्याकडे एकंदरीत आर्थिक परिस्थिती बिकट असेलेली मुल असली कि अनेकांना आपण आपल्याला नको असलेल्या वस्तू वाटायची हौस येते. “आमच्याकडे काल पार्टी होती त्यातलं बरंच अन्न उरलंय, तुमच्या पोरांना देऊ का?” “माझे काही ड्रेस आहेत, अजिबात वापरलेले नाहीत, तुम्हाला चालतील का?” असे फोन सुरुवातीच्या काळात अनेक यायचे. आपल्यातील बहुतांश लोकांना आपल्या गरजा आणि हौस यात फरक करता येत नाही. लागत नाहीत अश्या वस्तू खरेदी करतो, गरजेपेक्षा जास्त अन्न आपण तयार करतो कारण कोणीतरी आहेच ज्याला देता येईल. त्यासोबतच “ह्या मुलांना शिकवायचं असेल ना तर काहीतरी लालूच दिलंच पाहिजे ओ, त्याशिवाय हि शिकणारच नाहीत.” असाच बहुदा समज सगळ्यांचा असतो. या बाबतीत मॅान्टेसरीची गोष्ट नक्कीच शिकण्यासारखी आहे. मॅान्टेसरी स्कूल्स आपण अनेक पहिल्या असतील, पण मॅान्टेसरी हे नाव कसे आले ह्याचा इतिहास मात्र आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल. मारिया मॅान्टेसरी हि इटलीमधील एक शिक्षीका होती. रूढार्थाने ती काही बी.एड, एम.एड नाही तर चक्क महिला डॉक्टर होती. तिने शिक्षण क्षेत्राला दिलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळे पहिल्या शाळेच्या पायरीला मॅान्ट...