हे फोटोज का महत्त्वाचे आहेत????
जर तुम्ही ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान रामपुरा, चोपडा येथे गेलात तर तुम्हाला ७०% घरांना कुलूप दिसेल. कुठे जातात हि लोकं ? तर हि जातात ऊस तोडणी साठी किंवा रस्ते बनवण्याच्या कामासाठी. ऑक्सफॅमच्या एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण १५ लाख लोकं आपल्या मुलांसोबत ऊस-तोडणीसाठी स्थलांतर करतात. याकाळात हि मुलं शालेय शिक्षण प्रक्रियेपासून दूर तर जातातच पण त्याचसोबत त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातील बहुतांश मूल आपल्या पालकांना कामात मदत करताना कळत-नकळत बाल-मजुरीत लोटली जातात. ती कधी ऊस कापण्यासाठी हातात विळा घेतात तर कधी डांबर वाहण्यासाठी डोक्यावर टोपली. तात्पुरत्या उभ्या केलेल्या पालाच्या झोडप्यात अनेक समस्यांना तोंड देतात. कधीतरी कुटुंबातले मोठे कामावर गेलेले असताना त्या वस्त्यात एकटे राहताना शाररिक, लैंगिक छळाला सामोरे जातात. रामपुरात वर्धिष्णू सामाजिक संस्थेच्या अंतर्गत सुरु असलेल्या आमच्या आनंदघरातील शुभम आणि कालूसिंग या आमच्या फेलोजना ज्यावेळी हे कळलं कि आनंदघरातली १६ मुलं त्यांच्या पालकांसोबत स्थलांतरित होणार आहेत. त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला. मात्र स्वतःतल्