मेहरूण आनंदघराची १० वर्ष...
आज २ जानेवारी २०२४.
आज मेहरूण च्या आनंदघराला
१० वर्ष पूर्ण झाली...! विश्वास बसत नाही, कि तब्बल दहा वर्ष!
वर्धिष्णू संस्था स्थापन
झाली तेव्हा पाहिलं आनंदघर मेहरूण ला उघडण्यात आलं. या दहा वर्षाच्या प्रवासात
बरेच चढ- उतार आलेत. खूप गोष्टींच्या अनुभव आमच्या मुलांनी आणि आम्ही घेतला.
आज सकाळी आल्यापासून
आमच्या खूप चर्चा चालू होत्या. धावपळ चालली होती. कि, आज काय नवीन करायचं? आपल्याला आनंदघराचा foundation day साजरा तर करायचा आहे. पण नुसत ‘भेळ पार्टी’ करण्यात मज्जा
नाही. काहीतरी नवीन करावं? आम्ही तिघीही
(शीतल, निशा व प्रणाली) डोक्यावर बोट ठेवून विचार करत होतो,
तेवढ्याच आम्हांला एक कल्पना सुचली. असं काहीतरी करूया कि,
‘मुलं त्यांचा आणि आनंदघराचा भूतकाळ बघू शकतील?’
आम्ही लागलो कामाला.
‘आनंदघराचे सर्व जुने video शोधून
काढले आणि काही activities
ठरवल्या’. आता आमची जादूची पोटली खाजीण्यानी भरलेली होती.
तितक्याच आत्मविश्वसाने आम्ही आनंदघराची वाट पकडली.
आनंदघरात पोहचलो. मुलांची
गर्दी तिकडे जमलेली होती. आमच्या हातात projector बघून मुलं विचारात पडली व प्रश्न विचारू लागली? “ताई आज
आडी काय आहे?, तुम्ही picture दाखडणार का?, सांगा ना व काय आहे?”
मुलांना
आनंदघरात नेलं. आम्ही सर्वांनी शांतपणे आणि एका सुरात प्रार्थना म्हणालो.
(इथून
वर्ग चालू झाला....)
ताई:
आज काय special आहे, माहिती आहे काय तुम्हाला?
मुलं:
काय व ताई ?
मुलं
चक्क विसरली होती. जेव्हा त्यांना कळल कि ‘आज आनंदघराचा दहावा वाढदिवस आहे, तेव्हा मुलांना खूप आनंद झाला’.
मुलं लगेच ‘वाढदिवसाचे गाणं गायला लागले. ‘Happy birthday to
you….Anandghar…!’
ताई: तुम्हाला माहिती आहे ? ‘जसे आज आनंदघराला दहा वर्ष पूर्ण झाले तसेच, आज आपल्यात काही मुलं बसलेली आहे, त्यांना सुद्धा आज आनंदघरात येऊन दहा वर्ष पूर्ण झाली. तर आपण त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या आनंदघरासाठी जोरात टाळ्या वाजवू या..!’
पुढे
मुलांना त्यांचा आनंदघरातील जुना video दाखवला. Video साधारण
सात वर्ष जुना होता.
Projector सेट केला आणि
रंगीत चित्र भीती वर दिसायला लागली. मुलं एकदम शांत झालीत. एकमेकांच्या गळ्यात हात
टाकून.. मैत्रिणीच्या खांद्यावर डोकं ठेवत; video बघू लागली. Video मधे समाधान, शालू, प्रतीक्षा, अनिता, रोशनी, कल्याणी, नेहा आणि असे अनेक मुलं
स्वतः ला बघत होते. आणि खदखदून हसत होते. कारण आता ची हि चार चार -पाच फुट उंचीने
वाढलेली मुलं या video
मधे इवली इवलीशी दिसत होती. स्वतः असं पडद्यावर बघून त्यांना खूप ‘भारी’ वाटत
होतं.
मुलांना
video बघून कसं वाटलं याबद्दल मुलं मनसोक्त
बोलले. त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या.
शेवटी
मुलांनी आनंदघराला पत्र लिहले. हे पत्र होते आनंदघरातील ताईला, दादाला, त्यांना आनंदघरातील आवडणाऱ्या
वस्तूला, आणि भेट दिलेल्या ठिकाणाला.’ हि पत्र लिहतांना काही मुलांना लिहायला
अडचणी येतं होत्या. शब्द मांडणी कशी करायची पान एकमेकांच्या मदतीने त्यांनी हे
पत्र पूर्ण केलं.
वर्ग
संपला. मुलं घरी जाताना ताईला मिठी मारली. ताईने मुलांना thank you म्हटलं. मुलांनी सुद्धा ताईला thank you म्हटले. असा आजचा दिवस छान आठवणीत
रंगून गेला.
- निशा ताई आणि शीतल ताई...
Comments
Post a Comment