Posts

Showing posts from 2024

हे फोटोज का महत्त्वाचे आहेत????

Image
जर तुम्ही ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान रामपुरा, चोपडा येथे गेलात तर तुम्हाला ७०% घरांना कुलूप दिसेल. कुठे जातात हि लोकं ? तर हि जातात ऊस तोडणी साठी किंवा रस्ते बनवण्याच्या कामासाठी.  ऑक्सफॅमच्या एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण १५ लाख लोकं आपल्या मुलांसोबत ऊस-तोडणीसाठी स्थलांतर करतात. याकाळात हि मुलं शालेय शिक्षण प्रक्रियेपासून दूर तर जातातच पण त्याचसोबत त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातील बहुतांश मूल  आपल्या पालकांना कामात मदत करताना कळत-नकळत बाल-मजुरीत लोटली जातात. ती कधी ऊस कापण्यासाठी हातात विळा  घेतात तर कधी डांबर वाहण्यासाठी डोक्यावर टोपली. तात्पुरत्या उभ्या केलेल्या पालाच्या झोडप्यात अनेक समस्यांना तोंड देतात. कधीतरी कुटुंबातले मोठे कामावर गेलेले असताना त्या वस्त्यात एकटे राहताना शाररिक, लैंगिक छळाला सामोरे जातात. रामपुरात वर्धिष्णू सामाजिक संस्थेच्या अंतर्गत सुरु असलेल्या आमच्या आनंदघरातील शुभम आणि कालूसिंग या आमच्या फेलोजना ज्यावेळी हे कळलं कि आनंदघरातली १६ मुलं  त्यांच्या पालकांसोबत स्थलांतरित होणार आहेत. त्यावेळी त्यांना मोठा धक...

Why do these photos matter the most???

Image
If you visit Rampura in Chopda Taluka of Jalgaon District between October to April, you will see locks to almost 70% of the households. Where do these people go? These elders migrate with their entire family to Raigad to work as Sugarcane Cutters, they also go to work for road constructions. Children also migrate with their parents during this period. In these 6 months children help their family in everything they do. They cut sugar-cane, they help them lift buckets of sand, tar. Not having access to schools or education is just a tip of the ice-berg. Children faces under-nourishment, health-issues, physical-verbal-sexual abuse during this period. Our Fellows were very much disturbed when they got to know that almost 16 children from Chopda Anandghar are going to migrate with their parents. From the next day they started having dialogue with parents to understand why they are migrating and if there is any possibility of them not going. They were constantly going to their houses to conv...

मेहरूण आनंदघराची १० वर्ष...

Image
आज २ जानेवारी २०२४. आज मेहरूण च्या आनंदघराला १० वर्ष पूर्ण झाली...! विश्वास बसत नाही, कि तब्बल दहा वर्ष! वर्धिष्णू संस्था स्थापन झाली तेव्हा पाहिलं आनंदघर मेहरूण ला उघडण्यात आलं. या दहा वर्षाच्या प्रवासात बरेच चढ- उतार आलेत. खूप गोष्टींच्या अनुभव आमच्या मुलांनी आणि आम्ही घेतला. आज सकाळी आल्यापासून आमच्या खूप चर्चा चालू होत्या. धावपळ चालली होती. कि, आज काय नवीन करायचं ? आपल्याला आनंदघराचा foundation day साजरा तर करायचा आहे. पण नुसत ‘भेळ पार्टी’ करण्यात मज्जा नाही. काहीतरी नवीन करावं ? आम्ही तिघीही (शीतल, निशा व प्रणाली) डोक्यावर बोट ठेवून विचार करत होतो , तेवढ्याच आम्हांला एक कल्पना सुचली. असं काहीतरी करूया कि , ‘मुलं त्यांचा आणि आनंदघराचा भूतकाळ बघू शकतील ? ’ आम्ही लागलो कामाला. ‘आनंदघराचे सर्व जुने video शोधून काढले आणि काही activities ठरवल्या ’ . आता आमची जादूची पोटली खाजीण्यानी भरलेली होती. तितक्याच आत्मविश्वसाने आम्ही आनंदघराची वाट पकडली. आनंदघरात पोहचलो. मुलांची गर्दी तिकडे जमलेली होती. आमच्या हातात projector बघून मुलं विचारात पडली व प्रश्न विचारू लागली? “ताई आज आड...