आनंदघरातील तारे - प्रतीक्षा & रोशनी
आनंदघराच्या संपूर्ण प्रक्रियेतून आजपर्यंत ५००हुन मुलं-मुली गेल्या. यातल्या सगळ्यांचीच एक वेगळी कथा होती/आहे. प्रत्तेकाच्या अडचणी वेगळ्या, आवडी-निवडी वेगळ्या, प्रत्तेकात कुठली तरी कला दडलेली. मात्र या सगळ्यात काही जण मात्र संपूर्ण प्रक्रियेत स्वतःचं वेगळ स्थान निर्माण करून राहिले. याची कारण प्रत्तेक वेगळी वेगळी होती. काही कचरा वेचण्याच दुष्टचक्र मागे टाकून शाळेत जायला लागले, तर काहींची प्रचंड इच्छा असतानाही त्यांना अपरिहार्य कारणाने पुन्हा एकदा त्याच चक्रात जाव लागल. बहुतांश जळगावात टिकले, राहिले तर काही रातोरात जळगाव सोडून निघून गेले. अनेक प्रश्न तसेच सोडून. अश्याच काही आनंदघरातील तारांबद्दल... प्रतीक्षा आणि रोशनी प्रतीक्षा वय वर्ष ६, एकदम बारीक. मध्यंतरी तिला म्हणालो,“अशीच बारीक होत राहिलीस तर काही दिवसांनी गायब होऊन जाशील.” असं काही आपण म्हणालो, कीती तिच्या नेहमीच्या सवयीने होsहोssहोsss करून हसणार आणि “ताई, सर मला उगीच त्रास देता” अशी माझी तक्रार प्रणालीकडे करणार. प्रतीक्षा आणि तिचा ५ वर्षांचा भाऊ, तिच्या आईसोबत कचरा वेचायला पहाटे-पहाटे बाहेर पडणार ते थेट दुपारी परत येणार. मग थोडी झो...