आठवणीतले क्षण...


प्रत्यक्षात मला आलेले ही अनुभव मी लिहावे असे खूप दिवसांपासून मला वाटतं होते. कोविड-19 ह्या महामारी मुळे संपूर्ण देशात, राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच बंद होते. असेच विचार करत बसलेली होती, आनंदघर येथील सर्व मुलं घरी काय करत असतील, काय खात असतील, कुठे फिरत असतील कारण आता सर्वच बंद आहे. असे अनेक प्रश्न माझ्या मनात डोकावून जात होते.
या महामारीत मुलं स्वत:ची काळजी घेत असतील का? असेच विचार करीत असतांना केव्हा मी आनंदघराच्या गतकाळात गेले मला कळलेच नाही. आनंदघरातील चिवचिवाट करणारी ती मुलं, गजबजणारे त्यांचे आवाज, “ताई, ताई हा मारतो, ताई मी इथे बसू का?, ताई मी हे करू का?” असे कित्येक आवाज कानात ऐकू यायला लागले. कधी त्यांचा अबोला तर कधी त्यांचे भांडण त्यात तरीही मन प्रसन्न असायचे.
मला कधीच कंटाळा आला नाही त्यांचा आणि मग मला आठवले ते भाग्येश च्या वॉटरप्रूप भुताची गोष्ट; “ताई माझा भूत ना वॉटरप्रूप आहे. तो भूत माझ्या सोबत खेळतो, गाणे म्हणतो, मी आणि तो नाचतो, आम्ही दोघं फिरायला जातो. ताई त्याचे डोळे खूप मोठे आणि वॉटरप्रूप असतात, ताई तो खूप मोठा ढगासारखा आहे.” आणि मी हे सर्व शांतपणे ऐकते, आणि त्याची गोष्ट सांगून झाल्यावर मी भाग्येश ला विचारते, “तुला कुठे भेटला हा वॉटरप्रूप भूत मग भाग्येश म्हणतो, ताई रात्री सपनात आला होता.” खरंतर त्याच्या कल्पनेचे जग मला ऐकायला आवडते.
आणि तेवढ्यात मला आवाज आला. “आई ! ए आई !” आणि मी भानावर आले. पण सारखी सर्व मुलांची आठवण येतेय. कधी त्यांना भेटेन असे झाले आहे.



- अनिता साळवे.

Comments

Popular posts from this blog

हे फोटोज का महत्त्वाचे आहेत????

आनंदघराचं ग्रंथालय

Why do these photos matter the most???