मेहरूण आनंदघराची १० वर्ष...
आज २ जानेवारी २०२४. आज मेहरूण च्या आनंदघराला १० वर्ष पूर्ण झाली...! विश्वास बसत नाही, कि तब्बल दहा वर्ष! वर्धिष्णू संस्था स्थापन झाली तेव्हा पाहिलं आनंदघर मेहरूण ला उघडण्यात आलं. या दहा वर्षाच्या प्रवासात बरेच चढ- उतार आलेत. खूप गोष्टींच्या अनुभव आमच्या मुलांनी आणि आम्ही घेतला. आज सकाळी आल्यापासून आमच्या खूप चर्चा चालू होत्या. धावपळ चालली होती. कि, आज काय नवीन करायचं ? आपल्याला आनंदघराचा foundation day साजरा तर करायचा आहे. पण नुसत ‘भेळ पार्टी’ करण्यात मज्जा नाही. काहीतरी नवीन करावं ? आम्ही तिघीही (शीतल, निशा व प्रणाली) डोक्यावर बोट ठेवून विचार करत होतो , तेवढ्याच आम्हांला एक कल्पना सुचली. असं काहीतरी करूया कि , ‘मुलं त्यांचा आणि आनंदघराचा भूतकाळ बघू शकतील ? ’ आम्ही लागलो कामाला. ‘आनंदघराचे सर्व जुने video शोधून काढले आणि काही activities ठरवल्या ’ . आता आमची जादूची पोटली खाजीण्यानी भरलेली होती. तितक्याच आत्मविश्वसाने आम्ही आनंदघराची वाट पकडली. आनंदघरात पोहचलो. मुलांची गर्दी तिकडे जमलेली होती. आमच्या हातात projector बघून मुलं विचारात पडली व प्रश्न विचारू लागली? “ताई आज आड...