Posts

Showing posts from February, 2022

शिवमचं चित्र

Image
  शिवम ..आमच्या आनंदघरातील मुलगा . प्रचंड creative आहे , प्रत्येक गोष्टीत काही तरी नविन शोधून काढतो. बोलताना पण , काहीतरी नविन कौतुक करण्यायोग्य बोलतो. पण गेल्या काही दिवसांमध्ये त्याला काही काम दिल , काही activities करायला सांगितल्या तर तो , करायचं आहे म्हणून करत होता. जेव्हा त्याला हि drawing sh ee t दिली आणि त्याला सांगितल की , हे तुझं   झाड (चिञ) आहे जे पूर्णपणे वाळून गेल आहे. त्या झाडाची सर्व पाने गळून गेलेली आहे , तर आता तूला या झाडाला पुन्हा हिरवागार बनवायच आहे , विचार कर आणि रंगव. त्याने दोन मिनीटात झाडाला पान काढून आणून दिल. मी त्याला विचारल की ,“ की काय झालं शिवम तू एवढा क्रिएटिव्ह पण आता कुठलेही काम सांगितलेला तू करायचं म्हणून करतो सं . काही झालं का ? मी   त्याची प्रेमाने विचारपूस केली , याचं त्याला बरं वाटलं तुम्हाला थांबा 5 मिनिट मी पुन्हा येतो आणि तेव्हा शेवटी तो ड्रॉईंग शीट सबमिट करायला आला तर हे त्याचे चित्र होत. - निशा मसराम फेलो - एज्युकेटर समता नगर, आनंदघर...