Posts

Showing posts from January, 2022
Image
  दिपाली. फार लाघवी. वर्ग संपत आलेला असताना कपाटातला clay काढला तिने आणि काहीतरी बनवायला लागली. सुरुवातीला मी फारसं लक्ष नाही दिलं. नंतर हळूच बघितलं ती काय करतेय तर तिने clay पासून एक घर बनवलं होतं. त्या घरात एक मुलगी होती. एक बाळ बनवलं होतं. ती मुलगी त्या बाळाला सांभाळत होती. तिच्या हातात खुळखुळा होता. बाळाच्या हातात दुधाची बाटली होती. शेजारी स्वयंपाक घरातल्या गोष्टी होत्या. पोळपाट लाटणं, दुधाची किटली, तवा, चपाती, कुकर, चमचे अशा अनेक गोष्टी. खूप सहज अभिव्यक्त होत होती ती. कमाल वाटली ज्या बारकाव्यांनी तिने ती प्रतिकृती बनवली होती. खूप सुंदर..! पण थोड्या वेळाने त्याच्या मागचं वास्तव त्रास देऊ लागलं. मग विचार केला, तिने तेच बनवलं जे तिच्या आजूबाजूला ती दिवसभर बघत असते. स्वतःच्या लहान भावाला सांभाळते. पोळ्या लाटते. भाजी बनवते. दूध आणते. एका टप्प्यानंतर वस्तीतल्या मुली स्वीकारून टाकतात की हेच आपलं आयुष्य आहे. यात वेगळं काहीच होऊ शकत नाही. का नाही तिने clay च्या वह्या- पुस्तकं, पेन पेन्सिली बनवायच्या. तोपर्यंत काम करायचय जोपर्यंत दिपालीसारख्या मुली clayची पुस्तकं, वह्या पेन्सिली नाही...