Posts

Showing posts from October, 2018

गुड्डी आणि पूजा

आनंदघर सुरु करून काही दिवसच झाले होते . त्यावेळी पहिल्यांदा गुड्डी आणि पूजा या दोघा बहिणींशी ओळख झाली . पूजा १४ / १५ वर्षाची तर धाकटी गुड्डी साधारण ८ वर्षाची . वडील नाहीत . घरी या दोघी आणि यांची आई . पूजा आणि तिची आई दिवसभर कचरा वेचायला जायच्या आणि गुड्डी घरी बसून घरकाम करायची . दिवसा ती देखील कचरा वेचायला जायची पण दुपारपर्यंत परत येणार . संध्याकाळी आई आणि पूजा परत येईपर्यंत भाजी , भाकरी तयार करण , भात लावण , घर झाडून पुसून काढण हि सगळी काम गुड्डीची . वयाच्या मानाने उंची थोडी कमीच , थोडीशी लट्ठ , गुटख्याने कायम तोंड भरलेल आणि त्यासोबत शिव्यांची लाखोली . गुड्डीच कुठलंच वाक्य शिवी दिल्याखेरीस पूर्ण होतच नाही . अत्यंत भांडखोर म्हणून सगळ्यांमध्ये प्रसिद्ध . पण हळू - हळू लक्षात यायला लागल कि हि मुलगी हुशार आहे . धीट आहे . गुड्डीच इतरांशी कधीच पटल नाही . एखाद्याने त्रास दिला तर हि कानाखाली वाजवून द्यायला पण कमी करायची नाही . थोड जरी मनाविरुद्ध झाल कि हिने समोरच्याला तुडवलाच म्हणून समजा . सुरुवातीला आम्हाला देखील हिच्याशी वागाव कस हे कळायचं नाही . गुड्डीच वागण , बोलण , शिव्या देण , मार...