नेहा
आनंदघराच्या सुरुवातीच्या काळात फक्त तिथ जायचं आणि मुलांसोबत मस्तपैकी गप्पा मारायच्या एवढंच आमचा दिनक्रम होता . लॅपटॉपवर कार्टून बघायची , काही गाणी बघायची , गाणी म्हणायची . ज्यांना यात मजा येत होती ती हे सगळ करताना रमून जायची आणि ज्यांना काही मजा नाही अस वाटायचं ती मात्र त्यांच्या - त्यांच्यात दुसरा काहीतरी खेळ शोधून काढायची किंवा इतरांना त्रास द्यायची . नेहा ह्या दुसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या मुलींपैकी एक . वय साधारण १०वर्ष , अंगकाठी अगदी बारीक , मळके कपडे , तोंडात कायम विमल आणि हसरे पण सतत काहीतरी खोड्या काढायचा विचार करणारे टपोरे डोळे . नेहा तिथ यायची ते इतरांना त्रास द्यायलाच . कोणालातरी डोक्यावर टपली मारणार . कोणालातरी शिव्या देणार . थोडी चौकशी केल्यानंतर कळाल कि तिला वडील नाहीयेत . आई , ती आणि दोन भाऊ , त्यातल्या एकाच लग्न झालेलं . त्याच्यासोबतच अख्ख कुटुंब राहायचं . नेहा आणि तिचा धाकटा भाऊ आई सोबत पहाटे पहाटे कचरा गोळा करायला जायची ती थेट दुपारीच परत यायची . बाहेरची काम झाल्यावर घरची काम पण तिचा पिच्छा सोडायची नाहीत आणि याचा राग ती सगळ्यांवर काढायची . शाळा तिने खूप पूर्वीच ...