Posts

Showing posts from 2018

गुड्डी आणि पूजा

आनंदघर सुरु करून काही दिवसच झाले होते . त्यावेळी पहिल्यांदा गुड्डी आणि पूजा या दोघा बहिणींशी ओळख झाली . पूजा १४ / १५ वर्षाची तर धाकटी गुड्डी साधारण ८ वर्षाची . वडील नाहीत . घरी या दोघी आणि यांची आई . पूजा आणि तिची आई दिवसभर कचरा वेचायला जायच्या आणि गुड्डी घरी बसून घरकाम करायची . दिवसा ती देखील कचरा वेचायला जायची पण दुपारपर्यंत परत येणार . संध्याकाळी आई आणि पूजा परत येईपर्यंत भाजी , भाकरी तयार करण , भात लावण , घर झाडून पुसून काढण हि सगळी काम गुड्डीची . वयाच्या मानाने उंची थोडी कमीच , थोडीशी लट्ठ , गुटख्याने कायम तोंड भरलेल आणि त्यासोबत शिव्यांची लाखोली . गुड्डीच कुठलंच वाक्य शिवी दिल्याखेरीस पूर्ण होतच नाही . अत्यंत भांडखोर म्हणून सगळ्यांमध्ये प्रसिद्ध . पण हळू - हळू लक्षात यायला लागल कि हि मुलगी हुशार आहे . धीट आहे . गुड्डीच इतरांशी कधीच पटल नाही . एखाद्याने त्रास दिला तर हि कानाखाली वाजवून द्यायला पण कमी करायची नाही . थोड जरी मनाविरुद्ध झाल कि हिने समोरच्याला तुडवलाच म्हणून समजा . सुरुवातीला आम्हाला देखील हिच्याशी वागाव कस हे कळायचं नाही . गुड्डीच वागण , बोलण , शिव्या देण , मार...

नेहा

आनंदघराच्या सुरुवातीच्या काळात फक्त तिथ जायचं आणि मुलांसोबत मस्तपैकी गप्पा मारायच्या एवढंच आमचा दिनक्रम होता . लॅपटॉपवर कार्टून बघायची , काही गाणी बघायची , गाणी म्हणायची . ज्यांना यात मजा येत होती ती हे सगळ करताना रमून जायची आणि ज्यांना काही मजा नाही अस वाटायचं ती मात्र त्यांच्या - त्यांच्यात दुसरा काहीतरी खेळ शोधून काढायची किंवा इतरांना त्रास द्यायची . नेहा ह्या दुसऱ्या प्रकारात मोडणाऱ्या मुलींपैकी एक . वय साधारण १०वर्ष , अंगकाठी अगदी बारीक , मळके कपडे , तोंडात कायम विमल आणि हसरे पण सतत काहीतरी खोड्या काढायचा विचार करणारे टपोरे डोळे . नेहा तिथ यायची ते इतरांना त्रास द्यायलाच . कोणालातरी डोक्यावर टपली मारणार . कोणालातरी शिव्या देणार . थोडी चौकशी केल्यानंतर कळाल कि तिला वडील नाहीयेत . आई , ती आणि दोन भाऊ , त्यातल्या एकाच लग्न झालेलं . त्याच्यासोबतच अख्ख कुटुंब राहायचं . नेहा आणि तिचा धाकटा भाऊ आई सोबत पहाटे पहाटे कचरा गोळा करायला जायची ती थेट दुपारीच परत यायची . बाहेरची काम झाल्यावर घरची काम पण तिचा पिच्छा सोडायची नाहीत आणि याचा राग ती सगळ्यांवर काढायची . शाळा तिने खूप पूर्वीच ...

प्रतीक्षा आणि रोशनी

प्रतीक्षा वय वर्ष ६ , एकदम बारीक . मध्यंतरी तिला म्हणालो ,’” अशीच बारीक होत राहिलीस तर काही दिवसांनी गायब होऊन जाशील .” अस काही आपण म्हणालो हि तिच्या नेहमीच्या सवयीने होहोहो करून हसणार आणि “ ताई , सर मला उगीच त्रास देता ” अशी माझी तक्रार प्रणालीकडे करणार . प्रतीक्षा आणि तिचा ५ वर्षाचा भाऊ , तिच्या आईसोबत पहाटे पहाटे कचरा वेचायला बाहेर पडणार . ते थेट दुपारी परत येणार . मग हि थोडी झोप काढणार आणि संध्याकाळी आनंदघरात येणार . आनंदघराच्या अगदी सुरुवातीपासून येणाऱ्या काही मुला / मुलींपैकी प्रतीक्षा एक . आनंदघरात आली कि हक्काने येऊन माझ्या मांडीतच बसणार . आल्यापासून निघेपर्यंत नुसती बडबड बडबड . प्रचंड गप्पिष्ट , नुसता टाईमपास . “ सरांनी हिला लाडावून ठेवलीये ” असा सगळ्यांचा माझ्यावरचा आरोप . पण पोरगी एकदम हुशार , एकपाठी . संध्याकाळी येताना अगदी स्वच्छ आवरून येणार . इतरांसोबत अजिबात मारामारी नाही करणार , शिव्या नाही देणार . शाळेत आजपर्यंत गेलेली नाहीच . पण जायला प्रचंड उत्सुक . शाळेत का जायचंय अस विचारल तर ,” गप्पा मारायला .” हे ठरलेल उत्तर . प्रतीक्षा आणि तिच्याच वयाची रोशनी म्हणजे ‘ आनं...